श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ही श्री सेवागिरी महाराजांच्या नावावरून ओळखले जाते. हे मूळचे जुनागड गिरणार गुजरात येथून भारत भ्रमण करीत करीत त्यांचे गुरु पुर्णगिरी यांचे आदेशावरून १९०५ साली पुसेगाव येथे आले.त्यांनी पुसेगाव हीच आपली कर्मभूमि मानून लोकांमध्ये भक्तीभाव जागृत करून त्याचबरोबर श्रद्धा, सेवा, नम्रता हीच खरी उपासना असा मानवता वादी शिकवण देऊन अनेक अलौकिक चमत्कार केले. १० जानेवारी १९४८ रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचा कार्यांचा प्रचार व प्रसार करणेकामी त्यांचे पश्चात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली.
श्री सेवागिरी मंदिर हे पुसेगाव ता. खटाव जि. सातारा येथे आहे. मराठ्यांची राजधानी सातारा येथून पूर्वेस ३६ कि. मी. अंतरावर पुसेगाव वसलेले आहे. गावचे पश्चिमेस छ. शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पवन झालेला वर्धनगड किल्ला असून उत्तरेस ब्रिटिश कालीन नेर तलाव आहे. दक्षिणेस इतिहास कालीन औंध संस्थान असून तेथे यमाई देवीचे मंदिर व पुराण वस्तु संग्रहालय प्रसिद्ध आहे. पूर्वेस महिमानगड किल्ला व नजीक गोंदवले तीर्थक्षेत्र आहे. याशिवाय नेर येथील पुरातन काशी विश्वनाथ मंदिर, नागनाथवाडी येथील नागनाथ मंदिर, अंभेरी येथील कार्तिक स्वामी मंदिर, तातोबा डोंगर इ. स्थाने आहेत. १०५ कि. मी. अंतरावर पंढरपुर हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तसेच शंभू महादेवाचे शिखर शिंगणापुर तीर्थक्षेत्र आहे.
दैनंदिन वेळापत्रक
| वेळ | दैनंदिन तपशील |
|---|---|
| सकाळी ५.३० वाजता | श्रीजी व परिवार देवाची प्रखाळ |
| सकाळी ६.०० वाजता | (पाककृती) पूजा |
| दुपारी १२.०० वाजता | श्रीजी मंगल आरती |
| दुपारी १२.०० नंतर | महाप्रसाद (आरती नंतर) |
| दुपारी १२.३० वाजता | मध्यान महापूजा व महाआरती |
| सायं. ७.१५ ते ७.४५ वाजता | आरती, प्रार्थना, व शेज आरती |
| सायं. ७.४५ वाजता नंतर | महाप्रसाद (आरती नंतर) |
सकाळी ५.३० वाजता
सकाळी ६.०० वाजता
दुपारी १२.०० वाजता
दुपारी १२.३० वाजता
सायं. ७.१५ ते ७.४५ वाजता
श्रीजी व परिवार देवाची प्रखाळ (पाककृती) पूजा
श्रीजी मंगल आरती
मध्यान महापूजा व महाआरती
महाप्रसाद (आरती नंतर)
आरती, प्रार्थना, व शेळ आरती
भक्ताचे मनोगत