मंदिर/ संस्थेचा इतिहास
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ही श्री सेवागिरी महाराजांच्या नावावरून ओळखले जाते. हे मूळचे जुनागड गिरणार गुजरात येथून भारत भ्रमण करीत करीत त्यांचे गुरु पुर्णगिरी यांचे आदेशावरून १९०५ साली पुसेगाव येथे आले. त्यांनी पुसेगाव हीच आपली कर्मभूमि मानून लोकांमध्ये भक्तीभाव जागृत करून त्याचबरोबर श्रद्धा, सेवा, नम्रता हीच खरी उपासना असा मानवता वादी शिकवण देऊन अनेक अलौकिक चमत्कार केले. १० जानेवारी १९४८ रोजी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यांचा कार्यांचा प्रचार व प्रसार करणेकामी त्यांचे पश्चात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट ची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली.
श्री सेवागिरी महाराज अध्याय